सिल्लोड : (प्रतिनिधी): केन्हाळा पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळेत आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत आयोजन करण्यात आले. याचबरोबर पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी शाळेत वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड ही करण्यात आली. नशामुक्ती अभियान अंतर्गत नशामुक्ती दिंडी काढण्यात आली.
सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या पालखी मिरवणुकीने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून अभंग, भजन आणि दिंडी सादर केली. यावेळी हनुमान मंदिरापुढे पंचायत समिती सदस्य सुमित्राताई बनसोड, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव पाटील बांबर्डे, सुदाम बनसोड, कृष्णा पांढरे, कौतिक पाटील पांढरे, सूर्यभान बनसोड, अजिनाथ भिंगारे, शिवाजी कुमावत, कलीम मिस्तरी अंकुश पवार, जनार्धन बोराडे, विलास देहाडे यांनी दिंडीचे स्वागत केले.
दिंडीमध्ये हरीनामासह विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, एक पेड माँ के नाम, नशामुक्ती च्या घोषणा दिल्या. घोषणानी व भजन गायनाने वातावरण भक्तिमय झाले. गावातील माता भगिनींनी दिंडीचे औक्षण करून पूजन केले व दिंडीचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रामचंद्र मोरे यांच्या नेतृत्वात सोमीनाथ राणे, महानंदा राजपूत, वंदना साबळे, विभाताई मेश्राम, श्रीनिवास जाधव, महेंद्र सूर्यवंशी, संभाजी पाटील, रमेश पवार, तेजस क्षीरसागर, विद्या
सरदार, स्वप्नजा पाटील, सदानंदी दोडके, कविता तेली, तहसीन शेख, मुकीता पठाण, साजिया शेख शाहीन परवीन, कमल पांढरे, शितल महाले, नसीर अहमद, कालिमुद्दीन, जुबेर कुरेशी, गणेश शिंदे, संतोष एंडले, राहुल दारून्टे यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले,
यावेळी श्रीनिवास जाधव यांनी प्रगती आषाढी वारीचे महत्त्व सांगितले. त्यानंतर पीएमश्री जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मुख्याध्यापक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये फळझाडे व सावलीची झाडे लावण्यात आली. प्रत्येक वर्गाला एक झाड दत्तक देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवली. झाडे लावा, झाडे जगवा या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमला.












